जलतरणपटू वेदांत सावंतचा सन्मान

vedant

नवी मुंबई, 15 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

मॅनमार ते बांगलादेश दरम्यानची टेकनॅट जेट्टी ते सेंट मार्टिन आयलंड चॅनेल ही 17 किमी अंतराची खाडी आपल्या 2 सहका-यांसह 4 तास 25 सेकंदात पोहून पार करीत जागतिक विक्रम करणा-या वाशी येथील वेदांत सावंत या 11 वर्षीय जलतरणपटूचा महापौर सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते आज महापालिका सर्वसाधारण सभेत सत्कार करण्यात आला. यावेळी उप महापौर अविनाश लाड, स्थायी समिती सभापती शिवराम पाटील, अतिरिक्त आयुक्त  रमेश चव्हाण,  सभागृह  नेता  जयवंत  सुतार ,  क्रीडा  समिती  सभापती लिलाधर नाईक, नगरसेविका फशिबाई भगत व्यासपिठावर उपस्थित होते.

वाशीच्या फादर ॲग्नेल स्कुलचा विद्यार्थी असणा-या वेदांत सावंत याने यापुर्वी मोरा – गेट वे आणि इतर खाड्या यशस्वीरोत्या पोहून पार केल्या आहेत. त्याने लहान वयात गाठलेल्या या यशाबद्दल त्याचे कौतुक करण्यात आले.