नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2017:
भारत आणि क्रोएशिया आर्थिक सहकार्य वाढीसाठी अनेक महत्वाचे करार केले. भारताच्या वाणिज्य आणि उद्योगमंत्री निर्मला सितारमण आणि क्रोएशियाचे उपपतंप्रधान मिस मार्टिना डेलिक यांनी काल क्रोएशियातील जगरेब येथे याबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
गेल्या तीन वर्षांतील द्वीपक्षीय व्यापार
- 2013-14 मध्ये 148.86 दशलक्ष डॉलर
- 2014-15 मध्ये 04 दशलक्ष डॉलर
- 2015-16 मध्ये 148.44 दशलक्ष डॉलर
गेल्या तीन वर्षांत जागतिक मंदीचा फटका अनेक देशांना बसला. मात्र असे असतानाही भारत आणि क्रोएशियामधील द्वीपक्षीय व्यापारला त्याची झळ पोहोचलेली नाही.