मुंबई, १४ फेब्रुवारी २०१७ /AV News Bureau:
अवैध दारुच्या धंदयाबाबत ग्रामीण भागात ग्रामरक्षक दल स्थापना करण्याचा कायदा पारित करण्यात आला आहे. या ग्रामरक्षक दलाच्या नियमावली बाबत आज मंत्रालयात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा बैठक घेतली.
या बैठकीत अवैध दारू धंदे, वाढणारी व्यसनाधिनता, दारुचे दुष्परिणामाबाबत लोकजनजागृती तसे लोक ग्रामरक्षक दल आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी उत्पादनशुल्क आयुक्त व्ही. राधा आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.