मुंबई,13 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
महावितरणतर्फे वीजग्राहक व कर्मचाऱ्यांकरिता तयार करण्यात आलेल्या मोबाइल ॲप केवळ सात महिन्यात सुमारे 10 लाख ग्राहकांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे. या ॲपद्वारे आतापर्यन्त 1 कोटी 70 लाख ग्राहकांचे मीटर रीडिंग घेण्यात आले आहे. तसेच 7 लाख 43 हजार ग्राहकांनी वीज बिलांचा भरणा करण्यासाठी या ॲपचा वापर केला आहे. तर 45 हजार 813 ग्राहकांना ॲपद्वारे नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.
या ॲपद्वारे नवीन ग्राहकांना वीजजोडणी अर्ज, वीजबिलांची माहिती व बिलांचा भरणा वीजसेवांविषयी तक्रारी व अभिप्राय इत्यादी सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय ज्याग्राहकांचे मीटर रीडिंग घेण्यात आले नाही त्यांना ॲपद्वारे मीटर रिडींग पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे ॲप महावितरण वेबसाईट, गुगल प्ले, ॲपल, विंडोज स्टोअर्स येथेउपलब्ध आहे.
- १ कोटीहून अधिक ग्राहकांकडून मोबाइल क्रमांक नोंदणी
महावितरणच्या सुमारे 1 कोटी 4 लाख ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोदणी महावितरणकडे केली आहे. या ग्राहकांना मीटर रीडिंग, वीजबिल, ऑनलाईन बिल, नवीन वीजजोडणीसाठीअर्ज व त्याची सद्यस्थिती, मीटर वाचन घेतल्याचा आणि देखभाल व दुरूस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद करणे इत्यादीबाबतच्या सूचना महावितरणतर्फे एसएम्एसद्वारे पाठविण्यात येत आहेत.