ठाणे पालिका आयुक्त व निवडणूक निर्णय अधिकारी संजीव जयस्वाल यांचे आदेश
ठाणे, 11फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ सुरळीत पार पाडण्यासाठी विविध आस्थापनातील कर्मचाऱ्यांना आज गडकरी रंगायतन मध्ये प्रशिक्षण देण्यात आले होते. मात्र या प्रशिक्षणासाठीं गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकरी संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत.
महापालिका सार्वत्रिक निवडणूक मध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष ,कक्ष अधिकारी १,२,३ आदी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले .सदरचे प्रशिक्षण दोन टप्या मध्ये घेण्यात आले. सर्व कर्मचाऱ्यांना मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करावे. प्रत्यक्ष मतदान दिवशीचीपरिस्थिती कशी हाताळावी आदीचे मार्गदर्शन करण्यात आले . सर्व प्रशिक्षकांना EVM मशीन प्रत्यक्ष हाताळण्यास देण्यात आले होते .
प्रशिक्षण कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब ,निवडणूक निर्णय अधिकरी अमोल यादव, उप आयुक्त संदीप माळवी, उप आयुक्त संजय निपाणे, माहिती व जनसंपर्क अधिकरीमहेश राजदेरकर, सहायक आयुक्त संजय शिंदे कार्यकारी अभियंता गोळे, अहिरे यांच्या सह कर्मचारी उपस्थित होते .