मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांचे प्रतिपादन
मुंबई, 11 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
गेले काही दिवस सामना काँग्रेसच्या पंतप्रधानांचे आणि मुख्यमंत्र्यांचे कौतुक करत आहे. आम्हाला सामना आणि शिवसेनेच्या सर्टिफिकेटची गरज नाही. शिवसेनेचा मुंबईत पराभव होणार हे निश्चित आहे. त्यामुळेच ते आमची व आमच्या कामांची प्रशंसा करत आहेत, असे प्रतिपादन मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत केले.
शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येणार असा कुणीतरी जाणूनबुजून अपप्रचार करत आहे. शिवसेना मुंबईच्या अधोगतीला जबाबदार आहे. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस मुंबई महापालिकेतच नव्हे तर राज्य सरकारमध्ये देखील एकत्र येणार नाहीत, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
काँग्रेसने पिपल्स रिपब्लिक पक्षाला आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सात जागा दिलेल्या आहेत. कॉंग्रेसने एकमेव आघाडी केलेली आहे. या सात हि ठिकाणी काँग्रेस व पिपल्स रिपब्लिक पक्षातर्फे लवकरच जाहीर सभा घेण्यात येणार आहेत, अशी माहिती जोगेंद्र कवाडे यांनी यावेळी दिली.