ठाणे, 10 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
ग्रामीण आणि शहरी भागातील सध्या कार्यरत असलेल्या तसेच नव्याने अस्तित्वात येणा-या विवाह मंडळानी, तसेच वधू-वर सूचक वेबसाईटस यांनी आपल्या विवाह मंडळाची नोंदणी आपल्या कार्यक्षेत्रातील निबंधक, विवाह मंडळ व विवाह नोंदणी यांचेकडे करणे बंधनकारक असल्याचे आदेश सर्वोच्च् न्यायालयाने जाहिर सूचनेद्वारे दिले आहेत.
विवाह झालेल्या वधू-वर यांनी तीन साक्षीदारांसह वर किंवा वधू ज्या ठिकाणी राहतात, त्या कोणत्याही एका ठिकाणच्या निबंधक विवाह मंडळ आणि विवाह नोंदणी यांचेकडे व्य्क्तीश: उपस्थित राहून विवाहाची नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी न करणा-यांवर विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम तरतूदीचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येईल असेही जाहीर सूचनेद्वारे नमूद करण्यात आले आहे.
विवाह मंडळाच्या नोंदणीची नियमावली, अर्जाचे नमुने, भरावयाची फी, महाराष्ट्र विवाहमंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी नियम 1999 ची प्रत आदी सविस्त्र माहिती राज्य शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या igmaharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे. तरी विवाहमंडळ चालविणा-या व्य्क्तींनी त्यांचे विवाह मंडळाची नोंदणी व वधू-वर यांनी विवाहाची नोंदणी आपल्या क्षेत्रातील निबंधक विवाह मंडळ व विवाह नोंदणी यांचेकडे विनाविलंब करावी असे आवाहन सार्वजनिक आरोग्य् विभागाने जाहीर केलेल्या सूचनेद्वारे करण्यात आले आहे.