ठाणे, 9 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
ठाणे शहर हद्दीतील राज्य महामार्ग क्र. 42 या ठाणे घोडबंदर वरील तत्त्वज्ञान सिग्नल ते मानपाडा दरम्यान आर मॉल रोडवर पादचारी पुलाच्या उभारण्याकरिता मानपाडा जंक्शन ते तत्त्वज्ञान सिग्नल या दरम्यानची सर्व प्रकारची वाहतूक शुक्रवार 10 फेब्रुवारी रोजी रात्री 10 पासून ते शनिवार दिनांक 11 फेब्रुवारी, 2017 रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
घोडबंदर रोडने गायमुख मार्गे ठाणे शहरात जाणाऱ्या जड अवजड वाहनांनी मनोर -रोजनोली – मानकोली-खारेगाव टोल नाका मार्गाचा वापर करावा.
मुंबईकडून ठाणे बाजूने घोडबंदररोडवरून पुढे अहमदाबाद दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांनी कापूरबावडी सर्कल – बाळकूम – कशेळी – अंजूरफाटा -चिंचोटी-वसई – या मार्गाचा वापर करावा .
पनवेल व महापे , नवी मुंबई येथूनमुंब्रा बायपास मार्गे घोडबंदर मार्गाने अहमदाबाद -गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांनी खारेगाव टोलनाका -मानकोली -वडपे –चाविंद्रा (भिवंडी) -वाडा मनोर या मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.