शिक्षणक्षेत्राकडे वळा :- डॉ. राजन वेळूकर 

dr velukar

पनवेल, 7 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

अध्ययन आणि अध्यापनाच्या पद्धती बदलल्या आहेत. लोकसंख्येसोबत विज्ञानाची प्रगती होऊन यांत्रिकपणा वाढत आहे.तरीही शिक्षणक्षेत्राचे महत्व वाढतच असून तरुणांनी शिक्षणक्षेत्राकडे वळवे. त्याचबरोबर बदलत्या परिस्थितीचा वेध घेत उच्चशिक्षितांनी व्यवसाय उभा करून नोकरीच्या संधी निर्माण केल्या तरच स्वतःबरोबर देशही बदलू शकेल असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांनी पनवेलमध्ये  केले. सीकेटी महाविद्यालयामध्ये आज आयोजित केलेल्या पदवी प्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुणेम्हणून ते बोलत होते.

मुंबर्इ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ राजन वेळुकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा पदवीप्रदान सोहळा पार पडला. यावेळी जेबीएसपीचे व्हार्इस चेअरमन यशवंत देशमुख, कार्यकारी मंडळ  सदस्य अनिल भगत,सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य एस टी गडदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

शिक्षण आणि विकास याचा परस्पर संबंध असतो. उच्च शिक्षणाच्या दृष्टिकोनातून देशातील २५ टक्केच लोकांपर्यंत उच्च शिक्षण पोहोचले आहे व अद्याप ७५ टक्के समाजापर्यंत उच्च शिक्षण पोहोचलेले नाही. जगासमोर बेरोजगारी ही समस्या आहे. परंपरागत नोकऱ्या जाऊन बुद्धिवादी नोकऱ्या निर्माण होणार आहेत व त्यासाठी आयुष्यभर शिक्षण घेण्याची आवश्यकता असणार.त्यामुळे शिक्षणसंस्थांना शिक्षणाच्या पलीकडे नाविन्याचा वेध घेणारे शिक्षण द्यावे लागेल असेही ते म्हणाले .