पनवेल, 4 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
रायगड जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी पनवेलमध्ये भारतीय जनता पार्टी-आरपीआय युतीच्या उमेदवारांनी आज आपले अर्ज दाखल केले.
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता, माजी खासदार रामशेठ ठाकूर, भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदिश गायकवाड यांच्या उपस्थितीत उमेदवारांनी प्रांत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केले.
यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र येरूणकर, तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, शहर अध्यक्ष जयंत पगडे, युवानेते परेश ठाकूर, माजी नगराध्यक्षा चारूशिला घरत, राज्य परिषद सदस्य सी. सी. भगत, पंढरीशेठ फडके, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत, माजी तालुकाध्यक्ष तानाजी खंडागळे , जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ देशेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, शहर सरचिटणीस नितीन पाटील, गणेश पाटील, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बिनेदार, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, प्रल्हाद केणी, शहर अध्यक्षा मुग्धा लोंढे, कॄष्णाशेठ ठाकूर, शिवाजी दुर्गे, अनेष ढवळे , युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमर पाटील यांच्यासह माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये महिला व युवकांची उपस्थिती लक्षणीय होती.
येत्या 21 फेबु्रवारीला रायगड जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक होणार आहेत. तर निकाल 23 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. पनवेल तालुक्यात गव्हाण, गुळसुंदे, वावंजे, नेरे, वडघर, केळ वणे, पालीदेवद, पळस्पे या आठ जिल्हा परिषद व वांवजे, चिंध्रण, नेरे, आदर्इ, पालीदेवद, विचुंबे, पळस्पे, कोन, पोयंजे, गुळसुंदे, करंजाडे, वडघर, वहाळ, गव्हाण, केळवणे, आपटा या सोळा पंचायत समितींचा समावेश आहे.
जिल्हापरिषदेसाठी उमेदवारी अर्ज
- गव्हाण जिल्हा परिषद- हेमंत नामदेव ठाकूर
- गुळसुंदे जिल्हा परिषद- विनोद सदाशिव साबळे
- पालीदेवद जिल्हा परिषद- अमित मोहन जाधव
- पळस्पे जिल्हा परिषद-लिना राजेंद्र पाटील
- वडघर जिल्हा परिषद-ठकीबर्इ शंकर वाघे
पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज
- गव्हाण पंचायत समिती- रत्नप्रभा अरूण घरत
- वहाळपंचायत समिती- देवकी लक्ष्मण कातकरी
- पोयंजे पंचायत समिती- ज्ञानेश्वर दत्तात्रेय सुर्वे
- चिंध्रण पंचायत समिती- कमळाबार्इ एकनाथ देशेकर
- नेरे पंचायत समिती- राज संजय पाटील
- आदर्इ पंचायत समिती- भुपेंद्र सदानंद पाटील
- पालीदेवद पंचायत समिती- अमोल शेषराव इंगोले
- पळस्पे पंचायत समिती-सुनिल राजाराम गवंडी
- करंजाडे पंचायत समिती-समाधान अंबाजी ठाकरे