शिवसेनेच्या उद्यापासून प्रचार सभा

मुंबई,3 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

मुंबईसह राज्यातील महानगरपालिका आणि जिल्हा परिषद/पंचायत समितीच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी शिवसेनेतर्फे उद्यापासून जाहीर सभा घेण्यात येणार आहेत. 4 ते 19 फेब्रुवारी या काळात मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

मुंबईतील जाहीर सभा

  • 4 फेब्रुवारी रोजी मुंबईतील गिरगाव येथे पहिली जाहीर सभा
  • 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता भांडुप आणि रात्री 9 वाजता मुलुंड
  • 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता घाटकोपर आणि रात्री 9 वाजता सायन
  • 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता कांदिवली आणि रात्री 9 वाजता चारकोप
  • 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता अंधेरी आणि रात्री 9 वाजता विलेपार्ले
  • 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता वरळी आणि रात्री 9 वाजता परळ
  • 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता वडाळा आणि रात्री 9 वाजता दादर
  • 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता गोरेगाव आणि रात्री 9 वाजता दिंडोशी
  • 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता दहिसर आणि रात्री 9 वाजता मागाठणे
  • 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता बीकेसी येथे मुंबईतील समारोपाची सभा होणार आहे.

मुंबई बाहेर जाहीर सभा

  • 13 फेब्रुवारी रोजी पिंपरी- चिंचवड
  • 15 फेब्रुवारी रोजी पुणे
  • 16 फेब्रुवारी रोजी नाशिक
  • 17 फेब्रुवारी रोजी ठाणे

गेली 25 वर्षे महाराष्ट्रात अभेद्य असलेली शिवसेना-भाजपची युती आता तुटली आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची कोणतीही संधी सोडताना दिसत नाही. त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या सभांची रणधुमाळी चांगलीच रंगणार आहे.