नवी मुंबई ३ जानेवारी 2017/AV News Bureau:
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज 82.03 टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान सिंधुदुर्ग या जिल्ह्यात 94.72 टक्के झाले आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली आणि कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही .
जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी (Tentative Report) पुढीलप्रमाणे आहे :
- ठाणे-71.50 टक्के,
- पालघर-87.17 टक्के,
- रत्नागिरी-91.17 टक्के,
- रायगड-88.90 टक्के
- सिंधुदुर्ग-94.72 टक्के