मुंबई दि. 26 जानेवारी 2017
महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी टिळक भवन येथे उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अद्यावत वॉर रूमचे उद्घाटन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मंत्री नसीम खान, डी.पी. सावंत, खासदार हुसेन दलवाई, आमदार भाई जगताप प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत प्रवक्ते आणि वॉर रूमचे प्रमुख डॉ. राजू वाघमारे, सरचिटणीस ऍड. गणेश पाटील, राजन भोसले, रामकिशन ओझा, चिटणीस अल नासेर झकेरिया, अभिजीत सपकाळ, सुधीर पवार, विनय खामकर उपस्थित होते.
महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी पूर्णत्वाकडे आली असून बहुतांश ठिकाणचे उमेदवार निश्चित झाले आहेत. प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी निश्चित करण्याचे काम सुरु असून लवकरच राज्यातील सर्व ज्येष्ठ नेते प्रचारात उतरतील. वॉर रूमच्या माध्यमातून सोशल मिडीया आणि इतर माध्यमातून काँग्रेस पक्ष अधिक जोरदार पध्दतीने प्रचार अभियान राबवेल,असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, सरचिटणीस रामकिशन ओझा, चिटणीस आबा दळवी आणि अभिजीत सपकाळ यांच्या नेतृत्वाखालील वॉर रूम कार्यरत राहणार असून आगामी निवडणुकीच्या प्रचारात वॉर रूम महत्त्वाची भूमिका निभावेल असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.