मुंबई, २४ जानेवारी 2017/AVIRAT VAATCHAL NEWS:
मागाठाणे विधानसभा क्षेत्रामध्ये आज भाजपाच्या पाच संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार करण्यात आले. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी ही उपस्थीत होते.
मागाठाणे विधानसभा क्षेत्रात आमदार प्रविण दरेकर यांच्या पुढाकाराने निवडणूक कार्यालय सुरू करण्यात आली आहेत. वॉर्ड क्र. २६ मध्ये नालंदा बुद्ध विहाराजवळ, वॉर्ड क्र. २६ मध्येच लक्ष्मीनगर, दामूनगर लास्ट बसस्टॉपजवळ, वॉर्ड क्र. ११ मध्ये गणेश चौक, काजूपाडा येथे तसेच एस.एन.दुबे रोड रावळपाडा येथे आणि कानडे मैदान केतकी पाडा येथे ही कार्यालये सुरू करण्यात आली आहेत.
या कार्यक्रमाला खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासह आमदार प्रविण दरेकर, नगरसेवक प्रकाश दरेकर, भाजप मुंबई जिल्हाध्यक्ष, भाजप पदाधिकारी उपस्थीत होते.