लखनऊ, 22 जानेवारी 2017 :
होणार की नाही, अशा दोलायमान अवस्थेत असणारी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसची उत्तरप्रदेशमध्ये अखेर आघाडी झाली आहे. जागा वाटपाचा तिढा सुटला असून 403 जागांपैकी298 जागा सपाला तर 105 जागांवर काँग्रेस निवडणूक लढणार आहे.
आज दोन्ही पक्षांनी आघाडी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सपातर्फे प्रदेश अध्यक्ष नरेश उत्तम आणि काँग्रेस प्रदेशअध्यक्ष राज बब्बर यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली.
दोन्ही पक्षांची आघाडीसाठी बोलणी सुरू असताना सपाने आपली उमेदवारांची यादी जाहीर करून खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये आघाडी होणार नाही, असे तर्क लढविले जात होते. मात्र दोन्ही पक्षांनी चर्चा करून शेवटी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे.
धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी ही आघाडी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. सपा आणि काँग्रेसने आघाडी करीत नव्या राजकारणाची सुरूवात केल्याचे नरेश उत्तम यांनी सांगितले.