मुंबई, 21 जानेवारी 2017/ AV News Bureau:
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळामार्फत अनुसूचित जातीतील (नवबैाध्द, महार, बुरुड, खाटीक, मेघवाल, रुखी,वाल्मिकी, मेहतर इ.) पात्र उमेदवारांकरिता त्यांचे व्यावसायिक कौशल्य वाढविण्याच्या उद्देशाने जनरल प्रशिक्षण योजना अनुदान योजना, बीजभांडवल योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई शहर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय मुंबई शहर/उपनगर कार्यालयाच्या ०२२- २६५९२६४० /२६५९९८९५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.