कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत इस्त्रायल येथे रोजगाराची संधी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 13 जानेवारी 2025

 महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत ठाणे जिल्ह्यातील उमेदवारांना इस्त्रालय येथे रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या बाबीकरीता इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या, वय वर्षे 25 ते 45 वयोगटाचे उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत.

सोबतच उमेदवारांकडे काळजीवाहू (घरगुती सहायक) सेवांसाठी निपुण/पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाव्दारे मान्यताप्राप्त असलेले व किमान 990 तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. भारतीय प्राधिकरणाव्दारे प्रदान केलेल्या मिडवायफरीमधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंटमधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक, तसेच जीडीए/एएनएम/जीएनएम/बीएससी नर्सिंग/पोस्ट बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

अधिक माहिती व नोंदणीसाठी www.maharashtrainternational.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन ठाणे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त, श्रीमती संध्या साळुंखे यांनी ठाणे जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना केले आहे.

========================================================


========================================================