- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 5 डिसेंबर 2024
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली.
पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.
इथे वाचा : रविवारपर्यंत ठाण्यातील वेगवेगळ्या भागात २४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाने कामाची व्यापकता अधिक वाढविली होती. कधी नव्हे एवढी चर्चा मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची झाली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात धाडसी निर्णय घेतले. त्यावर टीकाही झाली. मात्र सामान्य जनतेला त्यांच्या निर्णयांचे कौतुक वाटले. आता मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडल्या पडल्या त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर सर्वप्रथम स्वाक्षरी करून या विभागाच्या माध्यमातून आपली नवीन वाटचाल सुरु केली आहे.
========================================================
========================================================