दुपारी 3 वाजेपर्यंत ऐरोलीमध्ये 39 टक्के तर बेलापूरमद्ये 41.48 टक्के मतदान

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 20 नोव्हेंबर 2024

नवी मुंबईतील दोन्ही मतदार संघांमध्ये मतदान पार पडत असून दुपारी 3 वाजेपर्यंत ऐरोली विधानसभा मतदार संघात 39 टक्के तर बेलापूर विधानसभा मतदार संघात 41.48 टक्के मतदान पार पडले आहे.

नवी मुंबईच्या राजकारणाला वळण देणाऱ्या या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. ऐरोली विधानसभा मतदार संघातून भाजप महायुतीचे गणेश नाईक, शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीचे मनोहर मढवी, मनसेचे निलेश बानखेले आणि शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार विजय चौगुले आदी निवडणूक लढवित आहेत. तर बेलापूर मतदार संघात भाजप महायुतीच्या मंदा म्हात्रे, भाजप सोडून महाविकास आघाडीत गेलेले संदीप नाईक, अपक्ष उमेदवार विजय नाहटा, मनसेचे गजानन काळे आदी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

150 ऐरोली विधानसभा मतदार संघात 4 लाख 89 हजार59 मतदार आहेत. त्यामध्ये 2 लाख 72 हजार 504  पुरुष मतदार तर 2 लाख 16 हजार 423 महिला मतदार आहेत. शिवाय 132 अन्य मतदार आहेत.

ऐरोली विधानसभा मतदार संघात दुपारी तीन वाजेपर्यंत 1 लाख 90 हजार 734 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामध्ये 1 लाख 18 हजार 2 77 पुरुष मतदार (43.40 टक्के) तर 72 हजार 455 (33.48 टक्के) महिला मतदारांचा समावेश आहे. तर अन्य मतदारांची संख्या 2 इतकी आहे.

बेलापूर विधानसभा मतदार संघात 2 लाख 25 हजार 29 पुरुष मतदार तर 1 लाख 98 हजार 531 महिला मतदारांची संख्या आहे. म्हणजे एकूण मतदार 4 लाख 23 हजार 579 इतकी आहे.

बेलापूर विधानसभा मतदार संघात दुपारी 3 वाजेपर्यंत 1 लाख 75 हजार 689 मतदारानी हक्का बजावला आहे. त्याध्ये 94 हजार783 (42.12 टक्के) पुरुष तर 80 हजार 904 (40.75 टक्के)  महिला मतदारांचा समावेश आहे. तर अन्य मतदारांची संख्या 2 इतकी आहे.

========================================================


========================================================