राहुल गांधी ४ व ५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर 

राहुल गांधींच्या हस्ते कसबा बावड्यातील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे अनावरण- सतेज पाटील

  •  अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई,कोल्हापूर, 30 सप्टेंबर 2024

काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते होणार असून कोल्हापूर येथे होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार असल्याची माहिती विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला खासदार शाहू महाराजआमदार राजू आवळेआमदार जयश्री जाधवआमदार जयंत आसगावकरजिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटीलगोकुळचे संचालक चेतन नरकेकरणसिंह गायकवाड आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा : काँग्रेसचा भाजपाला आणखी एक धक्का, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

 राहुल गांधी शुक्रवारी ४ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात येत असून त्या दिवशी त्यांचा मुक्काम असेल. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता कसबा बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे. या अनावरण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे. ५ ऑक्टोबरला सायंकाळी कसबा बावड पॅव्हेलियन मैदानावर २००१ कलाकार नाटय सादर करणार आहेतयामध्ये १ हजार कलाकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत दिसणार आहेत. महाराजांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न या मध्यमातून केला जाणार आहे असे पाटील यांनी सांगितले.

 ५ ऑक्टोबर रोजी सकाळी राहुल गांधी हे राजर्षी शाहू समाधी स्थळाला भेट देऊन अभिवादन करतील. त्यानंतर कोल्हापुरात होत असलेल्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात १ हजाराहून अधिक निमंत्रित सहभागी होणार आहेत. यामध्ये सर्व धर्मीय लोक तसेच विविध NGO च्या प्रतिनिधींचा सहभाग आहे. राहुल गांधी या सर्वांशी संवाद साधणार आहेत. या संमेलनासाठी प्रभारी रमेश चेन्नीथलाप्रदेशाध्यक्ष नाना पटोलेमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणसुशीलकुमार शिंदेविधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरातविरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

हे देखील वाचा : समृध्दीला पर्यटनाची जोड

 काँग्रेस पक्ष ‘हाउस फुल्ल!’

राज्यातील मोठे नेते कोल्हापुरात असल्याने काँग्रेस मध्ये इनकमिंग होणार काया पत्रकारांच्या प्रश्नावर कॉग्रेस भरगच्च आहेऑलरेडी हाउसफुल आहे. मात्र येणाऱ्यांचे स्वागतच असेल असे सतेज पाटील यांनी सांगितले. 

=======================================================


========================================================