काँग्रेसचा भाजपाला आणखी एक धक्का,   माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

माजी आ. ओमप्रकाश पोकर्णाडॉ. मिनल पाटील खतगावकर व भाजपाचे शेकडो कार्यकर्तेही काँग्रेसमध्ये

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई20 सप्टेंबर 2024

काँग्रेसने आज भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का देत नांदेड जिल्ह्यात मोठे खिंडार पाडले. नांदेडचे माजी खासदारभाजपा नेते भास्करराव पाटील खतगावकरमाजी आमदार ओमप्रकाश पोकर्णायुवा नेत्या डॉ. मिनल पाटील खतगावकर यांनी दादर स्थित प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते व माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 

हे वाचा :  कोकणचे वायनाड व्हायला नको !

भास्करराव पाटील खतगावकर हे तळागाळातील कार्यकर्ते आहेतत्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा न करता काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे. नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते पदाधिकारी व वरिष्ठ नेते यांच्याशी चर्चा करून पक्ष प्रवेशाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. टिळक भवनमध्ये पक्ष प्रवेश झाला असला तरी नांदेड जिल्ह्यामध्ये भव्य कार्यक्रम घेऊन पक्षप्रवेश सोहळा केला जाईल. भास्करराव पाटील खतगावकर यांच्या प्रवेशाने नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेला आणखी बळ मिळेल व विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातूनही काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील”,असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला. 

हे वाचा : शिक्षणाचे वास्तव

यावेळी बोलताना भास्करराव पाटील खतगावकर म्हणाले कीकाँग्रेस पक्षात प्रवेश करताना पुन्हा माझ्या घरी आल्याचा आनंद होत आहे. काँग्रेस पक्षाने आमदारखासदारमंत्रीपदावर काम करण्याची संधी दिली आहे. मध्यंतरी दुसऱ्या पक्षात गेलो होतो पण आता घरी आलो आहे. नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष राज्यात मजबूत होत असून विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करूअसे खतगावकर म्हणाले.

========================================================


========================================================