सिडकोचे मुख्य अभियंता संजय चौधरी यांचा विद्यार्थाना सल्ला
पनवेल, 14 जानेवारी 2017/AV News Bureau:
आजच्या स्पर्धेच्या जगात मुलांवर प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष दडपण येत आहे. मुले यशाच्या मागे धावतात व अपयश आले की नाराज होतात. मात्र मनाचा कमकुवतता सोडून पुढे कामाला लागा, असा सल्ला सिडकोचे मुख्य अभियंता संजय चौधरी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व तुकाराम नारायण घरत ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
गव्हाण कोपर येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व तुकाराम नारायण घरत ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स यांचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ काल शुक्रवारी पार पडला. रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून सिडकोचे मुख्य अभियंता संजय चौधरी,खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या प्राचार्या राज अलोनी उपस्थित होते. त्याचबरोबर जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष वाय टी देशमुख, गव्हाणच्या सरपंच रत्नप्रभा घरत, वसंतशेठ पाटील, हेमंत ठाकूर, विश्वनाथ कोळी, वामनशेठ म्हात्रे, संजय घरत, भार्गव ठाकूर व अन्य मान्यवरसुद्धा यावेळी उपस्थित होते.