भारतीय मराठा महासंघाच्या नवी मुंबई कार्यकारिणी जाहीर

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 3 सप्टेंबर 2024

भारतीय मराठा महासंघाच्या नवी मुंबई शहरातील नवीन कार्यकारिणी आज ठाणे येथे जाहीर करण्यात आली. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आप्पासाहेब आहेर, राष्ट्रीय सरचिटणीस व प्रवक्ते राजन गावंड, प्रदेश अध्यक्ष महेश कदम, उद्योग आघाडी कोकण विभाग अध्यक्ष संजय पाटील, ठाणे जिल्ह्य अध्यक्ष प्रसाद घोरपडे, ठाणे शहर अध्यक्ष महेश मोरे यांच्या उपस्थितीत पद नियुक्ती देऊन जबाबदारी देण्यात आली.

नवी मुंबईच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीमणद्ये शरद लोंढे ( शहर प्रमुख – नवी मुंबई, उद्योग आघाडी ), सचिन चव्हाण ( शहर उपाध्यक्ष – ऐरोली विधानसभा), करण पाटील ( शहर सचिव – बेलापूर विधानसभा) निलेश पंडित ( उपविभाग अध्यक्ष – कोपरखैरणे), सरिता वेल्ये (विभाग अध्यक्ष – नेरुळ ), अथर्व पवार (शहर सहसचिव – उद्योग आघाडी, नवी मुंबई), आदिनाथ पवार ( विभाग अध्यक्ष – कोपरखैरणे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हे वाचा : इमारतींची पडझड आणि उदासिनता

नवी मुंबईच्या या नव्या कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे भारतीय मराठी महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रसाद घोरपडे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच नवीन कार्यकारिणी महासंघाचे कार्य नवी मुंबईत तळागाळात पोहोचवील, असा विश्वास प्रसाद घोरपडे यांनी  व्यक्त केला.

========================================================


========================================================

========================================================