घणसोली येथील बेघर निवारा केंद्रात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई,  15 ऑगस्ट 2024

देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त घणसोली येथील बेघर निवारा केंद्र येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवारा केंद्र कुटुंबातील सदस्यांनी लोकगीते, देशभक्ती गीते, तसेच सगळ्यांचे आरोग्य, जनजीवन आनंदात सुखात जावो अशी ईश्वराकडे प्राथना केली.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती समाजसेवक निलेश कचरे,केंद्र सहव्यवस्थापक राहुल वाढे, अक्षय हेरोडे, समाजसेवक सागर गाडगे,BARC च्या वैज्ञानिक विजयालक्ष्मी रविशंकर, स्वयंसेविका काळजी वाहक पुनम मिश्रा, परिचारिका  वैशाली डोंगरे आदी उपस्थित होते.


समाज्यातील विभिन्न समाजातील ,धर्मांतील, विविध भाषिक बेघर नागरिकांना सोबत स्वातंत्र्यदीन साजरा करताना देश विविधतेने नटलेला दिसून आला. दिनदुबळ्या, निराश्रित बांधवांसोबत स्वातंत्र्यदीन साजरा करताना एक कुटुंब मिळाल्याची भावना निर्माण झाली असे निलेश कचरे यांनी व्यक्त केले.

========================================================


========================================================