- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 5 ऑगस्ट 2024
गणेशोस्तवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर आणखी २० अतिरिक्त गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या २० अतिरिक्त गणपती विशेष गाड्यांचे ७ ऑगस्टपासून आरक्षण सुरू होईल. दरम्यान, गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेने आतापर्यंत २२२ गणपती विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत.
Edit : इमारतींची पडझड आणि उदासिनता
१) लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-रत्नागिरी द्वि-साप्ताहिक विशेष (८ फेऱ्या)
01031 विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दि.०६.०९.२०२४, दि.०७.०९.२०२४, दि.१३.०९.२०२४ आणि दि. १४.०९.२०२४ रोजी रात्री ८ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ४:५० वाजता पोहोचेल. (४ फेऱ्या)
01032 विशेष गाडी रत्नागिरी येथून दि. ०७.०९.२०२४, दि. ०८.०९.२०२४, दि. १४.०९.२०२४ आणि दि. १५.०९.२०२४ रोजी सकाळी ८:४० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी सायंकाळी ५:१५ वाजता पोहोचेल. (४ फेऱ्या)
गाड्यांचे थांबे:
ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड
डब्यांची रचना
२ वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी यासह १ गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार. (२१ डब्बे)
२) पनवेल-रत्नागिरी साप्ताहिक विशेष (४ फेऱ्या)
01443 विशेष गाडी पनवेल येथून दि. ०८.०९.२०२४ आणि दि. १५.०९.२०२४ रोजी पहाटे ४:४० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी सकाळी ११:५० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)
01444 विशेष गाडी रत्नागिरी येथून दि. ०७.०९.२०२४ आणि दि. १४.०९.२०२४ रोजी सायंकाळी ५:५० वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १:३० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)
गाड्यांचे थांबे
पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड
डब्यांची रचना
१ वातानुकूलित-द्वितीय, ४ वातानुकूलित-तृतीय, ११ शयनयान आणि २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी. (२२ डब्बे)
Article : स्वच्छतेसाठी शिस्त हवी
३) पुणे-रत्नागिरी साप्ताहिक विशेष (४ फेऱ्या)
01447 विशेष गाडी पुणे येथून दि. ०७.०९.२०२४ आणि दि. १४.०९.२०२४ रोजी मध्यरात्री १२:२५ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी सकाळी ११:५० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)
01448 विशेष गाडी रत्नागिरी येथून दि. ०८.०९.२०२४ आणि दि. १५.०९.२०२४ रोजी सायंकाळी ५:५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ५:०० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)
गाड्यांचे थांबे
चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड
डब्यांची रचना
१ वातानुकूलित-द्वितीय, ४ वातानुकूलित-तृतीय, ११ शयनयान आणि २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी. (२२ डब्बे)
४) पनवेल-रत्नागिरी साप्ताहिक विशेष (२ फेऱ्या)
01441 विशेष गाडी दि. ११.०९.२०२४ रोजी पहाटे ४:४० वाजता पनवेल येथून सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी सकाळी ११:५० वाजता पोहोचेल. (१ फेरी)
01442 विशेष गाडी दि. १०.०९.२०२४ रोजी सायंकाळी ५:५० वाजता रत्नागिरी येथून सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १:३० वाजता पोहोचेल. (१ फेरी)
गाड्यांचे थांबे
पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड
डब्यांची संरचना
३ वातानुकूलित-द्वितीय, १५ वातानुकूलित-तृतीय, १ गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार. (२० डब्बे)
५) पुणे-रत्नागिरी साप्ताहिक विशेष (२ फेऱ्या)
01445 विशेष गाडी दि. १०.०९.२०२४ रोजी पुणे येथून मध्यरात्री १२:२५ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी सकाळी ११:५० वाजता पोहोचेल. (१ फेरी)
01446 विशेष गाडी रत्नागिरी येथून दि. ११.०९.२०२४ रोजी सायंकाळी ५:५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ५:०० वाजता पोहोचेल. (१ फेरी)
गा़ड्यांचे थांबे
चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड
डब्यांची रचना
३ वातानुकूलित-द्वितीय, १५ वातानुकूलित-तृतीय, १ गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार. (२० डब्बे)
वरील सर्व गणपती विशेष गाड्यांची बुकिंग दि. ७.०८.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर विशेष शुल्कावर उघडेल.
या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.
========================================================
========================================================