जिनांश जैन, अलका कारेल  बॅडमिंटन स्पर्धेचे विजेते

नवी मुंबई महापौर चषक बॅडमिंटन स्पर्धा

4 गटांत 1200 खेळाडूंनी  सहभाग घेतला

नवी मुंबई, 13 जानेवारी 2017/AV News Bureau :

वाशीच्या एन.एम.एस.ए बॅडमिंटन कोर्टवर रंगलेल्या नवी मुंबई महापौर चषक बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष गटा जिनांश जैन  तर महिला गटात अलका कारेल यांनी विजेतेपद पटकावले. 10 ते 12 जानेवारी या काळात पार पडलेल्या या स्पर्घेत चार गटांमध्ये 1200 हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.  स्पर्धेतील विजेत्यांना 1 लक्ष 40 हजार रक्कमेची पारितोषिके प्रदान करण्यात आली.

क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती लिलाधर नाईक यांच्या हस्ते विजेत्यांना  पारितोषिके देण्यात आली. यावेळी महापालिकेचे क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, निवृत्त ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी  रमेश पोशम, एन.एम.एस.ए. चे कार्यकारी सचिव बारगजे व क्रीडा विभागाचे समन्वयक  दत्तात्रय गोरडे, बॅडमिंटन प्रशिक्षक शिवाकुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

DSC_0092

खुल्या गटातील उपविजेते

  • योगेश पाटील हे उप विजेतेपदाचे तर तुषार मुने हे तृतीय व आदित्य गायकवाड हे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले.
  • महिला खुल्या गटात आशिया एस. यांनी उपविजेतेपद तर सोनल मोदी यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.

11 वर्षाखालील गट

  • मुले -शरण पिल्ले हे विजेते, प्रखर जैन हे उप विजेते तसेच विश्व डोगा हे तृतीय आणि अश्मित हे चतुर्थ क्रमांकाचे विजेते ठरले.
  • मुली- रक्षा के. हिने विजेतेपदाचा, उर्वी. जे हिने उपविजेतेपदाचा तसेच अनन्या जी. हिने तृतीय व सानिका एस. हिने चतुर्थ क्रमांक पटकावला.

15 वर्षाखालील गट

  • मुले -वैभव तिवारी व विश्व पारेख हे अनुक्रमे विजेते व उप विजेते ठरले तसेच अनुराग कराईल आणि एशुनील बिंगले हे तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले.
  • मुली- ऋतीका राज व गौरी कदम या विजेत्या व उप विजेत्या तसेच आद्या विजू आणि निधी दळवी या तृतीय व चतुर्थ क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.

17 वर्षाखालील गट

  • मुले – अनिकेत सुवर्णा याने विजेतेपद तसेच राहूल बडगुजर यांनी उप विजेतेपद त्याचप्रमाणे मयांक व आकाश यांनी तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक पटाकाविले.
  • मुली -दिया एस. व करिश्मा टी. या अनुक्रमे विजेत्या व उप विजेत्या तसेच सानिका व मोनिका कोडूर या तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.