नवी मुंबई,13 जानेवारी 2017/ AV News Bureau :
कोकण विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक 23 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता कोकण भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. यापूर्वी ही बैठक 16 जानेवारी रोजी होणार होती. मात्र प्रशासकीय कारणामुळे त्या बैठकीची तारीख बदलण्यात आली आहे.
कोकण विभागात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर हे जिल्हे येतात. या जिल्ह्यांमधील ज्या नागरिकांना शासनाच्या निरनिराळया कार्यालयातील कार्यरत अधिकारी वा कर्मचारी यांच्या कामकाजाबाबत विलंब, गैरव्यवहार, अकार्यक्षमता व इतर कारणाने होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबतच्या तक्रारी द्यावयाच्या असतील, त्यांच्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या तक्रारी लेखी स्वरुपात आवश्यक त्या पुराव्यासह या समितीसमोर 23 जानेवारी रोजी बैठकीच्या वेळेपूर्वी दोन प्रतीमध्ये सादर कराव्यात, असे महसूल विभागाच्या उपायुक्तांनी कळविले आहे.