इमारतींच्या पुनर्वीकासबाबत 28 जुलै रोजी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

विजय नाहटा फाउंडेशन आणि नवी मुंबई को -ऑप हौसिंग फेडरेशन यांचा उपक्रम

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 26 जुलै 2024

विजय नाहटा फाउंडेशन आणि नवी मुंबई को -ऑप हौसिंग फेडरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने इमारतीचा पुनर्वीकास या विषयावर मार्गदर्शन शिबीर व चर्चासत्राचे येत्या रविवारी 28 जुलै रोजी आयोजन करण्सयात आलेआहे. सकाळी 9.30 ते दुपारी 1 या काळात वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात हे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती निमंत्रक माजी आयुक्त आणि शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी  दिली.

Edit : सोशल मिडियाचे मायाजाल

नवी मुंबईत जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गेली अनेक वर्षे भिजत पडला आहे. सिडको निर्मिती अनेक इमारतींची अवस्था जर्जर झाली असून या इमारतींमध्ये राहणारे नागरीक पुनर्विकासाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र पुनर्विकासाच्या प्रक्रियेविषयी अनभिज्ञ असल्यामुळे या प्रश्न रेंगाळत राहीला आहे. ही बाब लक्षात घेऊन  नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त आणि शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी विजय नाहटा फाउंडेशनच्या माध्यमातून नागरिकांसाठी इमारत पुनर्विकासाबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.

News Update : देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा, राज्यातील सर्व ज्येष्ठांना लाभ

या शिबिरामध्ये पुनर्वीकास कार्यप्रणाली, सभासदांना मिळणारे वाढीव क्षेत्र, एफएसआय, इतर सोयी सुविधा, कायदेशीर बाबी, कागदपत्रांची पूर्तता आदी विषयावर नवी मुंबई को -ऑप हौसिंग फेडरेशन लि. संचालक सुनिल चौधरी, सचिव भास्कर म्हात्रे आणि उपनिबंधक सह. गृहनिर्माण संस्था सिडको प्रताप पाटील, सह संचालक नगररचना नवी मुंबई मनपा सोमनाथ केकाण आदींचे मोलाचे मार्गदर्शन उपस्थित सभासद यांना लाभणार आहे.


यावेळी उपस्थिती सभासदांच्या काही शंका आणि प्रश्नोत्तरे यांना नामांकित वास्तू विशारद, कायदेशीर सल्लागार आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पी एम सी ) आदी उत्तरे देणार असून सदर शिबिरात मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विजय नाहटा फाउंडेशनचे अध्यक्ष विजय नाहटा यांनी केले आहे.

========================================================

========================================================