- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- ठाणे, 25 जुलै 2024
IMD यांनी मुंबई, मुंबई उपनगर, रत्नागिरी, पालघर ,ठाणे या जिल्ह्यात पुढील २४ तासाकरिता अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अशोक शिनगारे यांनी उद्या शुक्रवार, 26 जुलै 2024 रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
नागरिकांनी सतर्क राहावे व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे
दरम्यान, ठाणे शहरात आज पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरू असून एका दिवसात 180 मि.मी इतका पाऊस झालेला आहे. तसेच हवामानखात्याने रेड ॲलर्ट जाहीर केला होता, त्यानुसार पूर्वतयारी म्हणून आपत्कालीन यंत्रणा कोणत्याही परिस्थतीचा सामना करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहे. आज झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाणे महापालिकेतील आपत्कालीन कक्षास भेट देवून दिवसभरातील परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच उद्या देखील मोठी भरती असल्याने महापालिका हद्दीतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधितांना दिले.
========================================================
========================================================