सीसीटीव्ही कमांड सेंटरमधून महापालिका आयुक्तांकडून शहराचा आढावा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, २१ जुलै २०२४

आज सकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर सतत वाढत असल्यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचा घटना घडल्या आहेत.  नवी मुंबईत आता पावसाची संततधार सुरू आहे. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 91 पूर्णांक 11 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सकाळी वाशी नेरूळ, सानपाडा परिसरात साचलेलं पाणी आता ओसरलं असून जनजीवन सुरळित सुरू झालं आहे. दरम्यान आतापर्यंत बेलापूर इथल्या सेक्टर 8 आर्टिस्ट व्हिलेजच्या मागे असलेल्या डोंगरावर अडकलेल्या 60 हून अधिक पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. तर नेरूळ एमआयडीसी इथं अडकलेल्या एका नागरिकाला सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.

News Update : बेलापूर मध्ये अडकलेल्या 60 हून अधिक पर्यटकांचे रेस्क्यू

नमुंमपा मुख्यालयातील सीसीटीव्ही कमांड सेंटरमधून नवी मुंबईतील‌ शहर स्थितीवर लक्ष ठेवत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे पाणी साचून‌ आहे अशा ठिकाणी त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत.

Edit :सोशल मिडियाचे मायाजाल

======================================================


========================================================