बेलापूर मध्ये अडकलेल्या 60 हून अधिक पर्यटकांचे रेस्क्यू

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
    नवी मुंबई, 21 जुलै 2024

नवी मुंबई परिसरात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. बेलापूर इथल्या आर्टिस्ट कॉलनीच्या मागे असलेल्या डोंगरावर गेलेले 60 हून अधिक तरूण पर्यटक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे अडकले होते. बेलापूर अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, जवान यांच्या मदतीने या तरूणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.

आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी या ठिकाणी हजर राहून परिस्थितीचा आढावा घेतला. तर तुर्भे एमआयडीसी इथल्या पावणे एमआयडीसी नोसील कंपनीच्या मागे काहि नागरिक अडकल्याची शक्यता आहे. वाशी आ़णि कोपरखैरणे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून नागरिकांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.

Edit : सोशल मिडियाचे मायाजाल

सीबीडी बेलापूर प्रमाणेच पावणे एमआयडीसी भागातील दोन नागरिकांचीही पाणी साचलेल्या भागातून सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

पावसामुळे शहरात वाशी सेक्टर 1, नेरूळ सेक्टर 18, सानपाडा इथल्या सखल भागात पाणी साचलं आहे.

दरम्यान, सकाळी साडेआठ वाजल्यापासून दुपारी दीड वाजेपर्यंतच्या पाच तासांत 83 पूर्णांक 38 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे दरम्यान अतिवृष्टीच्या इशाराच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार आणि आपत्कालीन विभागाचे उपायुक्त शरद पवार यांच्यासह मुख्यालयातल्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला भेट देत नवी मुंबई शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांनाही कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. आयुक्त शहरातील विविध ठिकाणांनाही स्धळ भेटी देत प्रत्यक्ष पाहणी करत आहे.

=======================================================


=======================================================