- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 19 जुलै 2024
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर २०२ विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गणपती विशेष गाड्या क्रमांक 01151, 01152, 01153, 01168, 01171, 01172, 01185, 01165 आणि 01166 चे बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर विशेष शुल्कासह २१ जुलैपासून सुरु होणार आहे. तर ट्रेन क्र. 22119/22120 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-करमाळी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्स्प्रेस आणि ट्रेन क्र. 12229/12230 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत या गाड्यांचे बुकिंग, पावसाळ्यात वेळापत्रकात बदल झाल्यामुळे बंद करण्यात आले होते, तेदेखील २१ जुलैपासून सुरु होणार आहे.
गणपती विशेष गाड्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणेः
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी रोड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दैनदिन विशेष (36 फेऱ्या)
- 01151 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 1 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर (18 फेऱ्या) रोज रात्री 12.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 2.20 ला सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचेल.
- 01152 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 1 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर (18 फेऱ्या) रोज सायंकाळी 3.10 ला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4.35 ला सीएसटीला पोहोचेल.
गाडीचे थांबे
दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
डब्यांची रचना
या विशेष गाड्यांना दोन वातानुकूलित थ्री टायर, 12 स्लीपर, 2 गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 6 जनरल सेकंड क्लास.
News Updates : देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा, राज्यातील सर्व ज्येष्ठांना लाभ
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- रत्नागिरी -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दैनदिन विशेष (36 फेऱ्या)
- 01153 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 1 ते 18 सप्टेंबर या काळात (18 फेऱ्या ) सकाळी 11.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 8.10 वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
- 01154 विशेष रत्नागिरी येथून 1 ते 18 सप्टेंबर या काळात (18 फेऱ्या) पहाटे 4 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 1.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
गाडीचे थांबे
दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.
डब्यांची रचना
दोन वातानुकूलित-तृतीय, 12 शयनयान आणि 2 गार्ड्स ब्रेक व्हॅनसह 6 जनरल सेकंड क्लास.
लोकमान्य टिळक टर्मिनस-कुडाळ- लोकमान्य टिळक टर्मिनस दैंनदिन विशेष (36 फेऱ्या)
- 01167 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 1 ते 18 सप्टेंबर या काळात (18 फेऱ्या) रोज रात्री 9 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9.30 वाजता कुडाळ येथे पोहोचेल.
- 01168 विशेष कुडाळ येथून 1 ते 18 सप्टेंबर या काळात (18 फेऱ्या) रोज दुपारी 12 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 12.40 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
गाडीचे थांबे
ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर (फक्त 01168 अप साठी), खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड (फक्त 01168 अप साठी), संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे (फक्त 01168 अप साठी), राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव (फक्त 01168 अप साठी), कणकवली आणि सिंधुदुर्ग.
डब्यांची रचना
दोन वातानुकूलित-तृतीय, 12 शयनयान आणि 2 गार्ड्सच्या ब्रेक व्हॅनसह 6 जनरल सेकंड क्लास.
Edit : स्वच्छतेसाठी शिस्त हवी
लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड-लोकमान्य टिळक टर्मिनस दैंनदिन विशेष (36 फेऱ्या)
- 01171 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 1 ते 18 सप्टेंबर या काळात (18 फेऱ्या) रोज सकाळी 8.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 9 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.
- 01172 विशेष सावंतवाडी रोड येथून 1 ते 18 सप्टेंबर या काळात (18 फेऱ्या) रोज रात्री 10.20 ला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10.40 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
गाडीचे थांबे
ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
डब्यांची रचना
दोन वातानुकूलित-तृतीय, 12 शयनयान आणि 2 गार्ड्सच्या ब्रेक व्हॅनसह 6 जनरल सेकंड क्लास.
लोकमान्य टिळक टर्मिनस-कुडाळ- लोकमान्य टिळक टर्मिनस त्रि-साप्ताहिक विशेष (16 फेऱ्या)
- 01185 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर सोमवार, बुधवार आणि शनिवार 2 ते 18 सप्टेंबर या काळात (8 फेऱ्या) रात्री 12.45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 12.30 वाजता कुडाळ येथे पोहोचेल.
- 01186 विशेष कुडाळ येथून 2 ते 18 सप्टेंबर याकाळात (8 फेऱ्या) दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी सायंकाळी 4.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4.50 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
गाडीचे थांबे
ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर (फक्त 01186 अप साठी), खेड, चिपळूण, सावर्डा (फक्त 01186 अप साठी), आरवली रोड (फक्त 01186), संगमेश्वर रोड, साठी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव (फक्त 01186 अप साठी), कणकवली आणि सिंधुदुर्ग.
डब्यांची रचना
दोन वातानुकूलित- तृतीय, 12 शयनायान आणि 2 गार्ड्सच्या ब्रेक व्हॅनसह 6 जनरल सेकंड क्लास.
लोकमान्य टिळक टर्मिनस-कुडाळ- लोकमान्य टिळक टर्मिनस वातानुकूलित साप्ताहिक विशेष (6 फेऱ्या)
- 01165 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर मंगळवारी 3, 10 आणि 17 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12.45 ला सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 12.30 वाजता कुडाळ येथे पोहोचेल.
- 01166 विशेष प्रत्येक मंगळवारी 3, 10 आणि 17 सप्टेंबर रोजी कुडाळ येथून सायंकाळी 4.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे4.50 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
गाडीचे थांबे
ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर (फक्त 01166 अप साठी), खेड, चिपळूण, सावर्डा (फक्त 01166 अप साठी), आरवली रोड (फक्त 01166 अप साठी), संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव (फक्त 01166 अप साठी) कणकवली आणि सिंधुदुर्ग.
डब्यांची रचना
एक वातानुकूलित-प्रथम श्रेणी, 3 वातानुकूलित-द्वितीय, 15 वातानुकूलित-तृतीय, एक पँट्री कार आणि दोन जनरेटर कार
दिवा-चिपळूण-दिवा मेमू दैंनदिन अनारक्षित विशेष (36 फेऱ्या)
- 01155 मेमू विशेष दिवा येथून 1 ते 18 सप्टेंबर याकाळात (18 फेऱ्या) सकाळी 7.15 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 2 वाजता चिपळूण येथे पोहोचेल.
- 01156 मेमू विशेष चिपळूण येथून 1 ते 18 सप्टेंबर याकाळात 18 फेऱ्या) दुपारी3.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10.50 वाजता दिवा येथे पोहोचेल.
गाडीचे थांबे
निलजे, तळोजा,पंचानंद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जीते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सप्पे वामणे, करंजाडी, विन्हेरे, देवाणखाऊ , कळंबणी, खेड आणि अंजनी.
डब्यांची रचना
12 कार मेमू रेक
========================================================
======================================================