- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 17 जुलै 2024
नवी मुंबई परिसरात एमडी (मेफेड्राॅन) हा अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोन आरोपींना नवी मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने १६ जुलै रोजी वाशी येथे सापळा रचून अटक केली आहे. या आरोपींकडून तबब्ल दोन कोटी रुपयांचे १ किलो ४ ग्रॅम वजनाचा एमडी हा अमली पदार्थ जप्त केला आहे.
News Update : सिडकोतर्फे निवासी वापरासह उद्योग व स्टार हॉटेलकरिता ४८ भूखंड व २१८ दुकाने विक्रीस
नवी मुंबई शहर अमल पदार्थ मुक्त करण्याचा निर्धार पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केला आहे. त्यानुसार सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे, अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, उपायुक्त गुन्हे यांनी अमली पदार्थांची तस्करी करणारे तसेच खरेदी विक्री करणाऱ्यांविरोधात तीव्र कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे.
Crime News : आर्थिक फसवणूक आणि सायबर गुन्हयांवर लक्ष
१६ जुलै रोजी वाशी येथे दोन इसम अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी कक्षाला मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरज चौधरी, सपोनि निलेश धुमाळ, सचिन कोकरे, पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर बनकर, रमेश तायडे, गणेश पवार, अंकुश म्हात्रे, संजय फुलकर, राकेश आहिरे यांच्या पथकाने वाशी सेक्टर ६ येथील सायन-पनवेल महामार्गावरील वाशी गाव बस स्टॉप येथे दोन व्यक्ती संशयास्पदरित्या आढळून आल्या. त्या दोन्ही व्यक्तींची चौकशी करून त्यांची तपासणी केली असता १ किलो ४ ग्रॅम वजनाचे एमडी (मेफेड्राॅन) हा अमली पदार्थ आढळून आला. या अमली पदार्थांची किंमत २ कोटी ८० हजार इतकी असून याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणीअधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
========================================================
========================================================