- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 15 जुलै 2024
सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईच्या विविध नोडमध्ये निवासी, बंगला, निवासी तथा वाणिज्यिक, वाणिज्यिक, सेवा उद्योग आणि स्टार हॉटेल वापराकरिता 48 भूखंडांसह सिडकोच्या गृहनिर्माण संकुलांतील 218 दुकानांच्या विक्रीची भव्य योजना सादर करण्यात आली आहे. भूखंड विक्री योजनेच्या ऑनलाइन नोंदणीस 6 जुलै 2024 पासून सुरुवात झाली आहे. तर दुकान विक्री योजनेच्या ऑनलाइन नोंदणीस १६ जुलै २०२४ पासून सुरुवात होणार आहे.
Editorial : स्वच्छतेसाठी शिस्त हवी
या वेळी सिडकोतर्फे नवी मुंबईच्या घणसोली, नेरूळ, सीबीडी बेलापूर, खारघर, कोपरखैरणे, कळंबोली, पनवेल (पू.) आणि पनवेल (प.) नोडमधील निवासी, बंगला, निवासी तथा वाणिज्यिक, वाणिज्यिक, सेवा उद्योग आणि स्टार हॉटेल वापराकरिताचे 48 भूखंड ई-निविदा तथा ई-लिलाव प्रक्रियेद्वारे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ई-निविदा तथा ई-लिलाव प्रक्रियेकरिता https://eauction.cidcoindia.com/ हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. योजनेकरिता ऑनलाइन नोंदणीचा कालावधी 8 जुलै 2024 ते 23 जुलै 2024 आहे. योजनेचा निकाल 25 जुलै 2024 रोजी जाहीर करण्यात येईल.
तसेच सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृहसंकुलासह नवी मुंबईतील तळोजा, कळंबोली, घणसोली, खारघर आणि द्रोणागिरी नोडमधील गृहसंकुलांतील 218 दुकाने ई-निविदा तथा ई-लिलाव प्रक्रियेद्वारे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ई-निविदा तथा ई-लिलाव प्रक्रियेकरिता https://eauction.cidcoindia.com/ हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. योजनेच्या ऑनलाइन नोंदणीस 16 जुलै 2024 पासून सुरुवात होणार आहे. योजनेचा निकाल 20ऑगस्ट 2024 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
News Update : देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा, राज्यातील सर्व ज्येष्ठांना लाभ
=====================================================
========================================================