मुंबई, 13 जानेवारी2017:
गेले अनेक दिवस चर्चेत राहिलेल्या टाटा सन्सच्या अध्यक्षपदासाठी नवा चेहरा मिळाला आहे. सायरस मिस्री हे अध्यक्षपदावरून बाजूला झाल्यानंतर त्यांच्याजागी नटराजन चंद्रशेखरन यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. 21 फेब्रुवारी रोजी ते नवा पदभार स्वीकारतील.
12 जानेवारी रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चंद्रशेखरन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. चंद्रशेखरन हे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ची धुरा सांभाळत होते. टीसीएस ही टाटा उद्योगातील सर्वाधिक नफा कमवणारी कंपनी आहे. त्यांच्या नेमणुकीमुळे टाटा सन्सला नवी उभारी मिळेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. चंद्रा यांच्या नियुक्तीचे उद्योग क्षेत्रातही स्वागत करण्यात येत आहे.