डी – मार्ट आस्थापनेवरील अनोंदणीकृत कामगारांना कामगार कायद्याअंतर्गत विविध लाभ देणार

कामगार मंत्री सुरेश खाडे यांची माहिती

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 4 जुलै  2024

डी – मार्ट यांच्या आस्थापनेमध्ये आणि त्यांच्या कंत्राटदाराकडे माथाडी कामगार व इतर असंघटित कामगार कार्यरत आहेत. यासंदर्भात विशेष पडताळणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत अनोंदणीकृत माथाडी कामगार आढळून आल्यास त्यांना नोंदीत करून घेऊन त्यांना विविध कामगार कायद्याअंतर्गत देय लाभ देण्यात येणार असल्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

News : ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आता 31 ऑगस्टपर्यंत मुदत

Click Here : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म

खाडे म्हणालेडी मार्ट  आस्थापनेची एकूण १०९ डिपार्टमेंटल स्टोअर्स व आठ वेअरहाऊस असून त्यामध्ये एकूण २३८ माथाडी कामगारांची माथाडी मंडळात नोंदणी आहे. या कामगारांची मजुरी व लेव्हीची रक्कम संबंधित मंडळामध्ये नियमित भरणा होत आहे. डी – मार्ट  अनोंदणीकृत कामगारांकडून अल्प वेतनात काम करून घेतले जाते. तसेच त्यांच्या लेव्हीची रक्कम संबंधित मंडळामध्ये नियमितपणे भरणा होत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे राज्यातील २८ डी मार्ट ची तपासणी केली असता ७९ माथाडी कामगार आढळून आले आहेत. या कामगारांची माथाडी मंडळात नोंद करण्यात येणार आहे. डी मार्ट मध्ये काम करणाऱ्या अनोंदणीकृत कामगारांना अल्प वेतन व लेव्हीची रक्कम नियमितपणे भरण्यात येत नसेल तर संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही खाडे यांनी यावेळी सांगितले.

========================================================


========================================================