पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील 49 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले

आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत नमुंमपा घणसोली शाळेतील दिप्ती पाटील ठाणे जिल्ह्यात पहिली  

पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत नमुंमपा राजर्षि शाहू महाराज विद्यालय शाळेतील तनुश्री टावरे नवी मुंबईत पहिली 

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 3 जुलै 2024

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 42, घणसोली येथील विद्यार्थिनी दिप्ती कैलास पाटील 84.56 टक्के गुण संपादन करीत संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील शाळांमधून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण व्हिजनचा नावलौकिक अधिक उंचावला आहे. यावर्षी नमुंमपा शाळांमधील इयत्ता पाचवीतील 28 व इयत्ता आठवीतील 21 असे एकूण 49 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले असून महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAD STORY : मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आता 31 ऑगस्टपर्यंत मुदत

शैक्षणिक वर्ष 2023-24 करीता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PUP) – इयत्ता 5 वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSS) – इयत्ता 8 वी याची परीक्षा  18 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतून इयत्ता 5 वीतील 3394 विद्यार्थी व इयत्ता 8 वीतील 2631 विद्यार्थी असे एकूण 6025 विद्यार्थी परीक्षेस बसले होते व त्यापैकी इयत्ता 5 वीतील 3246 विद्यार्थी व इयत्ता 8 वीतील 2501 विद्यार्थी अशा एकूण 5747 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

News Update : राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय राबाडा येथे स्वच्छता मतदान

यामध्ये नवी मुंबई महापालिका शाळांतून इयत्ता 5 वीतील 559 व इयत्ता 8 वीतील 521 असे एकूण 1080 विद्यार्थी दोन्ही शिष्यवृत्ती परीक्षेस बसले होते. त्यापैकी इयत्ता 5 वीतील 28 विद्यार्थी व इयत्ता 8 वीतील 21 विद्यार्थी अशाप्रकारे एकूण 49 विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये झळकले.

या विद्यार्थ्यांमधून इयत्ता आठवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (PSS) परीक्षेमध्ये दिप्ती कैलास पाटील (शाळा क्र.42, घणसोली) ही विद्यार्थिनी 84.56% गुण संपादन करून ठाणे जिल्हयातून व अर्थातच नवी मुंबई क्षेत्रातून सर्वप्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे.

News Update : नवी मुंबईतही नवीन तीन कायद्यांची अंमलबजावणी सुरू – पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे

तसेच इयत्ता पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (PUP) परीक्षेमध्ये तनुश्री निलेश टावरे (राजर्षि छत्रपती शाहू महाराज विद्यालय शाळा क्र.55, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, राबाडे) ही विद्यार्थिनी 78.91% गुण प्राप्त करून नवी मुंबई क्षेत्रातून सर्वप्रथम आलेली आहे.

हे यश विद्यार्थ्यांनी संपादन केले असून विद्यार्थ्यांसोबत त्यांना मार्गदर्शन करणा-या शिक्षकांचेही सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त शिरीष आरदवाड व शिक्षण विभागाच्या उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे यांनी शिष्यवृत्तीपत्र विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केलेले आहे.

========================================================


========================================================