राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय राबाडा येथे स्वच्छता मतदान

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई,  3 जुलै 2024

नवी मुंबई महानगरपालिका संचलित राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय राबाडा येथे स्वच्छता मतदान घेण्यात आले या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे मूल्यमापन करता आले त्याच बरोबर लोकशाहीमध्ये मतदान प्रक्रिया कशी राबवली जाते याचे प्रात्यक्षिक या सर्व प्रक्रियेतून समजावून सांगण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय तन्मयतेने या सर्व बाबी समजून घेतल्या व आपला सक्रिय सहभाग नोंदवला शाहू महाराज विद्यालयातील जवळपास नववी दहावीच्या 870 विद्यार्थ्यांनी या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला.

ही मतदान प्रक्रिया शाळेचे मुख्याध्यापक अमोल खरसंबळे , क्रीडा शिक्षक अमोलकुमार वाघमारे, सदानंद वाघमारे, रामराव कंदगुळे,दीपक कटरे, मेथाजी देसाई, विनोद झापडे यांच्या मार्गदर्शन खाली संपन्न झाली
सदर मतदान प्रक्रिये मध्ये प्रत्यक्ष मतदानावेळी असणारी सर्व व्यवस्था शाळेच्या सभागृहात मतदान कक्ष, मदत पेटी , मतदान अधिकारी , प्रतिनिधी यांची बसण्याची व्यवस्था प्रवेश, बाहेर जाणे, सेल्फी पॉइंट अशी सर्व महत्वपूर्ण व्यवस्था शिक्षक संतोष कारंडे, राजू राठोड ,दीपक चाबुकस्वार, शशी रणखांबे यांनी केली.

ही मतदान प्रक्रिया सकाळी 8 ते 12 या वेळेत घेण्यात यामध्ये अभिमन्यू मोटे व कैलास दाते यांनी झोनल ऑफिसर म्हणून काम पाहिले मतदान केंद्राध्यक्ष दिलीप निंबारा , मतदान अधिकारी विजय चौरे, वैशाली धनावडे, राजश्री उमराणीकर, कावेरी मॅडम, नीतू गावित,रिंकी कुशवाह, सोनी यादव, मिना सुतार तर शिल्पा टिकले, सुचिता पवाळ, रोहिणी पाटील यांनी मतदान प्रतिनिधी ही म्हणून काम पाहिल या सर्व उपक्रमास विद्यार्थी व शिक्षक आणि उत्तम प्रतिसाद दिला आणि स्वच्छता मतदान प्रक्रिया अतिशय शांततेत आणि उत्तम नियोजनामध्ये पार पडली.

========================================================


========================================================