राजेंद्र पाटील यांच्या निवडीने कार्यकर्त्यांनमध्ये उत्साह
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- उलवे, 15 जून 2024
मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय सल्लागारपदी रायगडमधील लोकनेते आणि उद्योजक राजेंद्र पाटील यांनी नियुक्ती करण्यातआली आहे. राजेंद्र पाटील यांच्या नियुक्तीमुळे मराठा क्रांती स्वराज्य संघटना महाराष्ट्रात बळकट होण्यास मदत होणार आहे.
News Update : अणुस्कुरा घाटातील दरड हटवली, वाहतूक सुरू
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले , राष्ट्रीय अध्यक्ष सुरत येथील उद्योजक विजयराव कदम, राष्ट्रीय सरचिटणीस बडोद्याचे उद्योजक प्रदीपभाई मोरे यांच्या सुचनेनुसार संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उद्योजक गजाननराव साळुंखे यांनी ही निवड जाहीर केली आहे. लोकनेते राजेंद्र पाटील यांच्या नियुक्तीमुळे रायगडमधील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
राष्ट्रीय सल्लागार निवृत्त सहायक पोलीस आयुक्त मुंबई अरविंद महापदी यांनी सांगितले की, लोकनेते राजेंद्र पाटील हे उरण विधानसभा क्षेत्र मतदार संघात लोकप्रिय जन नायक म्हणून सुपरिचित आहेत. याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक महाराष्ट्र म्हणुन ते अधिकृत निवडून आले होते.
Crime News : घराच्या अमिषाने महिलेची १५ लाखांना फसवणूक
राष्ट्रीय अध्यक्ष सुरत येथील उद्योजक विजयराव कदम यांनी सांगितले की, राजेंद्रशेठ पाटील यांची समाजभिमुख कार्य करण्याची धडपड तसेच समाजाकरिता त्यांचा संघर्ष पाहता अंगात भिनलेली समाज सेवेची धमक, काहीही करण्याची ऊर्मी, निर्भिडपणा, मृदू व लिन स्वभाव यांच्या बळावर त्यांनी समाजाला आपलेसे केले आहे. उरण पनवेल खालापूर विधानसभा क्षेत्र मतदार संघात समाज बांधव या जननायकाला आपलेसे मानतात.
मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले म्हणाले की, विकास कामांचा आराखडा, नियोजनात, शुद्ध चरित्र उरण विधानसभा निवडणुकीत उद्याचा आमदार अश्या वेगळ्या आशेने बघत आहेत. त्यांचे सामाजिक सांस्कृतिक क्रीडा पर्यावरण क्षेत्रातील योगदान कौतुकास्पद आहे.
Lead Story : देवेंद्र फडणवीसांची स्मार्ट खेळी
दरम्यान, लोकनेते राजेंद्र पाटील यांच्या निवडीची घोषणा होताच देशभरातून पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. हिमाचल प्रदेश अध्यक्ष उद्योजक चंद्रकांत वाघ, गुजरात राज्य अध्यक्ष राजुभाई शेवाळे, कर्नाटक राज्य अध्यक्ष आनंदराव घोरपडे, राष्ट्रीय सरचिटणीस एस. श्यामसुंदर गायकवाड, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव, राष्ट्रीय महिला अध्यक्षा प्रा. संध्या राणे, महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा वैशाली गलगटे, कोकण प्रदेश महिला अध्यक्षा सोनाली अविनाश कदम, मुंबई प्रदेश अध्यक्ष उद्योजक डॉ चंद्रकांत तुळशीराम मोजाड, पुणे जिल्हा अध्यक्ष सुरेशराव शेजवळ, नगर जिल्हा अध्यक्ष वसंतदादा मल्टी स्टेट बँकेचे संचालक उद्योजक दिपकराव धट पाटील, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष कृष्णा शेलार, रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र सुर्वे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष दत्तात्रय गोडसे, पिंपरी चिंचवड अध्यक्ष मंगेश चव्हाण, वसई विरार नालासोपारा अध्यक्ष जितेंद्र पालांडे, रंगभूमी चित्रपट विभाग राष्ट्रीय अध्यक्ष शिमगा चित्रपट निर्माते दिग्दर्शक निलेशराव पालांडे, दक्षिण गुजरात प्रमुख ॲड विराज सुर्वे, पालघर जिल्हा प्रभारी प्रथमेश सावंत, वहाळ गावचे उद्योजक प्रथमशेठ पाटील यांच्या सह शेकडो समाज बांधव मोठ्या संख्येने अभिनंदन केले.
========================================================
========================================================