- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 14 जून 2024
राजापूर आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या राजापूर तालुक्यातील अणुस्कूरा घाटात गुरुवारी सांयकाळी रस्त्यावर मोठी दरड कोसळ्यामुळे घाटातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रात्री उशिरापर्यंत दरड हटविण्याचे काम सुरु असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी अविरत वाटचाल न्यूज नेटवर्कला दिली.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हयांना जोडणारा अणुस्कूर घाट अतिशय महत्वाचा मानला जातो. मुंबईहून गोवा तसेच सिंधुदुर्गच्या दिशेने जाणारी वाहनेही मोठय़ा प्रमाणात अणुस्कूरा घाटातून जातात. वर्दळीचा मानल्या जाणाऱ्या या घाटात गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास मोठी दरड कोसळली होती. दरड कोसळ्याची माहिती मिळताच दरड हटवण्यासाठी राजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जेसीबीने ही दरड बाजूला हटवण्यासाठी तसेच मोठे खडक फोडून ही दरड हटवण्यासाठी ब्लास्टींग मशीनदेखील घटनास्थळी मागवण्यात आली होती.
रस्त्यावर कोसळलेली दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून रस्ता पूर्ण मोकळा करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
दरम्यान, घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक बंद ठेवण्यात आल्याची माहिती राजापूर तालुक्याच्या तहसिलदार यांनी दिली.
News Update : मुंबई शिक्षक व पदवीधर,कोकण विभाग पदवीधर मतदार संघात 3 लाख 59 हजार 737 मतदारांची नोंदणी
========================================================
========================================================
=======================================================