‘अकावा’ चे शनिवारी प्रकाशन

नवी मुंबई, 12 जानेवारी 17/AV News Bureau:

नवी मुंबईतील ज्येष्ठ साहित्यिक शंकर पंडित यांच्या ‘अकावा’ या काव्य संग्रहाचे प्रकाशन 14 जानेवारी  रोजी होणार आहे. वाशी येथील योग विद्या निकेतन येथे सायंकाळी सायंकाळी 5.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राध्यापिका तारा काळे असणार आहेत.

95 वर्षीय शंकर पंडित यांचा दरवर्षी एक काव्य संग्रह प्रकाशित होतो. आतापर्यंत त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यामध्ये समर्थ रामदास यांच्या दासबोध या मराठी ग्रंथाचा तसेच स्वामी रामदास यांच्या मनाचे श्लोक या पुस्तकाचाही त्यांनी इंग्रजी अनुवाद केला आहे. याशिवाय हा धुंद रानवारा, कधी कधी, शेला ढगांचा, वेल जांभळी, दिवलान आदी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच हिसका तुळशीचा  हे नाटक आणि सल, जोगिणी अशा कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या आहेत.