शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याच्या अमिषाने पावणे चार कोटींची फसवणूक

नवी मुंबई सायबर सेलने दोघांना अटक केली

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 3 जून 2024

शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करून अधिक नफा मिळविण्याचे आमिष दाखवुन वेगवेगळ्या व्हॉटसअप ग्रुप मध्ये समाविष्ठ करून त्यांचे गुंतवणुकीवर अधिकचा नफा दाखवून तब्बल एकुण ३,७०,०६,०००/- (तीन कोटी सत्तर लाख सहा हजार) इतक्या रक्कमेची आर्थिक फसवणूक फसवणुक करणाऱ्या २ आरोपींना नवी मुंबई सायबर पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सलमाल निजामु‌द्दीन खान, वय ३५ वर्षे, धंदा-वेटर, राहणार घनसोली, नवी मुंबई मूळ राहणार- दैवरीया, उत्तरप्रदेश आणि  प्रकाश करमशी भानुशाली, वय ३९ वर्षे, राहणार कोपरखैरणे, नवी मुंबई, मुळ राहणार- कच्छ, गुजरात यांनी १७ फेब्रुवारी २०२४ ते २४ एप्रिल २०२४  या काळात अनेक नागरिकांना शेअरमार्केट मध्ये गुंतवणुक करून जास्त नफा मिळविण्याचे आमिष दाखवुन गुंतवणुक करायला लावली. कालांतराने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदारांनी सायबर सेलकडे याबाबत तक्रार केली.

Lead Story : आर्थिक फसवणूक आणि सायबर गुन्हयांवर लक्ष – पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे

सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहित बंडगर, पोलीस उपनिरीक्षक सचिन गिड्डे, पोलीस कर्मचारी कारखेले, फटांगरे, जमदाडे यांनी तांत्रिक तपासाचे आधारे आरोपींचा छडा लावला. त्यानुसार आरोपी हे तुर्भे येथील स्वारस्वत बँक याठिकाणी बैंक खाते उघडण्याकरिता येणार असल्याची माहिती प्राप्त होताच ३१ मे रोजी सदर ठिकाणी सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली. या आरोपींना सध्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.

पोलिसांनी आरोपींकडे अधिक चौकशी केली असता ते गरजु लोकांना पैशाचे आमिष दाखवून त्यांचेकडुन बैंके खाते उघडण्याकरिता आवश्यक कागदपत्र तसेच त्याचे नावे सिमकार्ड घेऊन त्यांचे कागदपत्राचा वापर करून गुमस्था तसेच उदयम प्रमाणपत्र तयार करून एकाच दुकानाच्या नावावर वेगवेगळया बँकेमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे नावाने चालू (Current) खाते उघडली.

Lead Story : किनारपट्टी सुरक्षेसाठी सागर रक्षक एप (App)

या सर्व खात्यांची माहिती आरोपी त्यांचे दुबई येथील अन्य साथीदारांना पाठवित असत. या माहितीच्या बदल्यात दोन्ही आरोपींना त्यांच्या अन्य साथीदारांकडून मोठ्या रक्कम मिळत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. आरोपींनी तक्रारदारांकडून घेतलेली फसवणुकीची रक्कम भरलेल्या बँक खात्यांमध्ये एकुण ४६ लाख रुपये गोठविण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.


पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सहपोलीस आयुक्त संजय येनपुरे, अप्पर पोलीसआयुक्त दीपक साकोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम, पोलीस निरीक्षक विशाल पावीर, पोउपनिरी रोहित बंडगर, पोउपनिरी सचिन गिडे, पोलीस कर्मचारी कारखेले, फटांगरे, जमदाडे यांनी उघडकीस आणला आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक गजानन कदम करित आहेत.

========================================================

========================================================