- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 1 जून 2024
जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात चाणक्य सिग्नल जवळ पूर्वेकडील बाजूस जांभूळ आणि पश्चिमेकडील बाजूस बांबूच्या वृक्षारोपांचे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमाप्रसंगी उपस्थित अतिरिक्त आयुक्त सुनील पवार व शिरीष आरदवाड, उद्यान विभागाचे उपायुक्त दिलीप नेरकर, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त शशिकांत तांडेल, कार्यकारी अभियंता राजेश पवार इतर अधिकारी, कर्मचारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या ठिकाणी 100 जांभूळ व 200 बांबूच्या वृक्षारोपांची लागवड करण्यात येत आहे. या पावसाळी कालावधीत माझी वसुंधरा अभियानामध्ये नमुंमपा क्षेत्रात 1.5 लाख वृक्षारोपांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले असून सर्व झाडे देशी वृक्षारोपांची नवी मुंबईची जैवविविधता वाढवणारी असणार आहेत.
दिनांक 5 जून रोजीच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक विविध उपक्रम हाती घेण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध विभागांमध्ये लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
========================================================