फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी काँग्रेसची महापालिका आयुक्तांकडे साकडे
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- 16 मे 2024
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील इमारतींवर असणाऱ्या विनापरवानगी बेकायदेशीर टॉवरवर कारवाई करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे केली आहे.
NEWS: नवी मुंबई शहरातील सर्व होर्डींगचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करा -रविंद्र सावंत
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात दिघा ते बेलापुरदरम्यान इमारतींवर, शॉपिंग कॉम्पलेक्स व अन्य वाणिज्य संकुलांवर आपणास मोठ्या प्रमाणावर मोबाईल टॉवर लागलेले आहे. या सर्वांची पाहणी व मोजणी करून त्यातील किती अधिकृत व किती अनधिकृत आहेत, याची शहनिशा करण्यात येतील. यातील अनेक मोबाईल टॉवर निश्चितच विनापरवानगी, अनधिकृतरित्या लागलेले असणार, याची आम्हाला खात्री आहे.
NEWS : नवी मुंबईतील ७५ होर्डींग्जना नोटीस
विनापरवानगी बेकायदेशीररित्या असणाऱ्या मोबाईल टॉवरवर कारवाई करुन ते तात्काळ काढण्यात यावेत व संबंधितांवर महापालिका प्रशासनातर्फे फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. या विनापरवानगी लावण्यता आलेल्या अनधिकृत मोबाईल टॉवरमुळे महापालिका प्रशासनाचा आजवर लाखो रुपयांचा महसूल बुडालेला आहे, तोही यनिमित्ताने वसुल करण्यात यावा. मोबाईल टॉवर असणाऱ्या इमारतींचे तातडींने स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यास संबंधित गृहनिर्माण सोसायटी, शॉपिंग कॉम्पलेक्स व अन्य वाणिज्य संकुलांना द्यावेत. मोबाईल टॉवर सांभाळण्याइतपत संबंधित वास्तूची क्षमता आहे का, याचीही खातरजमा करणे आवश्यक आहे. अन्यथा वादळी वाऱ्यात मोबाईल टॉवर पडल्यास इमारतीचे नुकसान तसेच इमारतीखाली असणाऱ्या जिवितहानीचे नुकसान होण्याची भीती आहे.
NEWS: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा, प्रत्येकी 5 लाखांचा दंडही
त्यामुळे आपण तातडीने शहरातील मोबाईल टॉवर तपासणीचे आदेश देवून अनधिकृतरित्या विनापरवानगी लागलेल्या टॉवरवर कारवाई करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी केली आहे.
========================================================
========================================================