नवी मुंबईतील अनधिकृत शाळांची यादी जाहीर

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 26 एप्रिल 2024

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मार्च 2024 अखेर 5 प्राथमिक शाळा शासनाची   आणि नवी मुंबई  महानगरपालिकेची मान्यता न घेता अनधिकृतपणे चालवित असल्याचे निदर्शनास आले आहे. आर.टी.ई. अधिनियम 2009 मधील कलम-18 अन्वये कोणतीही नवीन शाळा मान्यतेशिवाय चालविता येत नाही.

तरी संबंधित शाळा व्यवस्थापकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना नजिकच्या महानगरपालिका किंवा अन्य मान्यताप्राप्त खाजगी शाळेत पालकांशी संपर्क साधून पुढील शिक्षणासाठी दाखल करावे आणि परवानगीशिवाय सुरू केलेली शाळा  तात्काळ बंद करावी. अन्यथा आपणाविरूध्द बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील कलम 18 (5) नुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी असे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जाहीर करण्यात येत आहे.

या अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचे नव्याने प्रवेश घेऊ नयेत. तसेच ज्या पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश या अनधिकृत शाळेत घेतले आहेतत्यांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश रद्द करून नजिकच्या शासनमान्य शाळेत प्रवेश घ्यावा, जेणेकरून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असेही महानगरपालिकेच्या वतीने सूचित करण्यात येत आहे.

========================================================


========================================================