निवडणूक संदर्भातील विविध परवानग्यांसाठी ‘सुविधा पोर्टलचा’ वापर करा

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे
  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 2 एप्रिल 2024

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार स्तरावर अथवा पक्षीय स्तरावर प्रचारासाठी आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्यांसाठी  सुविधा पोर्टल suvidha.eci.gov.in  चा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

बातमी वाचा : उद्धव ठाकरे, राहुल गांधींना मतदारच तडीपार करतील: नारायण राणे

माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण, मतदार जनजागृती स्वीप, मनुष्यबळ, वाहने, टपाली मतपत्रिका, आचारसंहिता, ईव्हीएम मशीन, मतदान केंद्र नियोजन, कायदा व सुव्यवस्था, निरिक्षकांची व्यवस्था, स्ट्राँग रुम व्यवस्था, दिव्यांग मतदार सुविधा आदींबाबत जिल्हाधिकारी श्री. शिनगारे वेळोवेळी आढावा घेत असून संबंधित नोडल अधिकाऱ्यांकडून केलेल्या कार्यवाहीची ते नियमितपणे माहिती घेत आहेत.

बातमी वाचा : राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे

उमेदवारास वैयक्तिक स्तरावर अथवा पक्षीय स्तरावर प्रचारासाठी आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्यांसाठी भारत निवडणूक आयोगाच्या ‘सुविधा’ या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करुन परवानगी घेता येते. निवडणूकसंबंधी कोणत्याही विषयात आचारसंहितेचे तंतोतंत पालन होईल, याची कटाक्षाने दक्षता घ्यावी. संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी सतर्क राहून दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण क्षमतेने पूर्ण कराव्यात, असेही जिल्हाधिकारी श्री.शिनगारे यांनी संबंधित नोडल अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

========================================================


========================================================