नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे
- सिद्धार्थ हरळकर / अविरत वाटचाल
- नवी मुंबई, 18 मार्च 2024 :
मुंबई शहराला लागून असलेल्या नवी मुंबई शहराचाही विस्तार झपाट्याने होत आहे. विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांमुळे नवी मुंबई शहर आंतरराष्ट्रीय हव होणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून रोजगार तसेच उद्योगांसाठी लोक या शहरात येणार आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे. नेमकी कोणती आव्हाने भेडसावतील, याबाबत नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे (navi mumbai police commissioner Milind Bharambe)यांनी अविरत वाटचालशी बोलताना विविध मुद्यांना स्पर्श केला.
प्रश्न: नवी मुंबई शहर झपाट्याने विस्तारत आहे. नवनव्या प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होणार असून लोकांचा ओढा वाढत आहे, अशावेळी कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने कोणती आव्हाने दिसतात ?
उत्तर : शहराच्या विस्तारीकरणामध्ये लोकसंख्या वाढीचा दबाव सातत्याने वाढत असतो. मात्र लोकसंख्या कशा त-हेची हा देखील महत्वाचा भाग असतो. सुदैवाने नवी मुंबई बऱ्यापैकी नियोजित शहर असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात नोकरदार मध्यमवर्ग जास्त आहे. इतर राज्ये वा शहरातून येऊन नवी मुंबईत स्थिरावलेल्यांचे प्रमाण जास्त आहे आणि हा मध्यमर्ग बऱ्यापैकी कायदेशीर वागणारा म्हणजे कायदे पाळणारा आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न एवढा गंभीर नाही. शिवाय स्थानिक आगरी कोळी समाजाचे काही निवडकच विषय असतात. त्या विषयांना अनुसरूनच त्यांची आंदोलनेही सिमित असतात, या सगळ्या गोष्टीचा विचार करता कायदा मुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न सध्यातरी निर्माण होत नाही. नवी मुंबई परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळ येत आहे. त्यामुळे लॉजिस्टीक येणार असून त्यामध्ये कामगारांची संख्याही तेवढ्याच प्रमाणात वाढणार आहे. सततच्या वाढत्या लोकसंख्येमुळे तिसरे शहर आकारास येणार आहे. नैना प्रकल्प उभा रहात आहे, जेम्स एन्ड ज्वेलर्सचे मोठे पार्क होणार आहे. खारघर येथे कापरिट पार्क येणार आहे. नुकताच अटल सेतू सुरु आला आहे. एकूणच नवी मुंबई परिसरात प्रचंड प्रमाणात गुंतवणूक होत असून मोठ्या प्रमाणात विस्तारीकरणाची प्रक्रीया सुरु झालेली आहे. या सगळ्या बदलांशी निगडीत आमच्यासमोरील कायदा सुव्यवस्था राखण्याचीआव्हानेही वाढत जाणार आहेत. नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात कामानिमित्त आलेला वर्ग आहे. तो बऱ्यापैकी मॅच्युअर्ड आहे. पण सध्या भेडसावणाऱ्या आव्हानांमध्ये प्रामुख्याने फायनान्शिअल क्राईम्स (आर्थिक फसवणुकीचे गुन्हे) आणि सायबर क्राईम्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. जेवढी प्रचंड गुंतवणूक तेवढे आर्थिक गुन्हेगारीचे प्रमाण वाढू शकते. ही बाब लक्षात घेवूनच आम्ही आर्थिक आणि सायबर गुन्हयांवर अधिकाधिक लक्ष केंद्रीत केले असून त्यादिशेने मोठ्या प्रमाणात काम सुरु केले आहे.
प्रश्नः नवी मुंबईतील भविष्यात उभे राहणारे प्रकल्प आणि प्रकल्पग्रस्तांकडून होणारा संभाव्य विरोध आणि त्यातून उभी राहणारी आंदोलने यापार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेची कोणती आव्हाने असणार आहेत ?
उत्तर : वाढते शहरीकरण आणि स्थानिक भूमीपूत्र हा संवेदनशील विषय आहे. शहरांचा सर्वांगिण विकास करायचा असले तर जमीन आवश्यक असते. नवी मुंबई शहर हे स्थानिक आगरी कोळी समाजाच्या पिढीजात चालत आलेल्या जमिनींवर वसलेले आहे. त्यामुळे जेव्हा आपल्या वाडवडीलांच्यापासून आलेल्या जमिनी विकासासाठी घेतल्या जातात, तेव्हा साहजिकच अनेकदा संघर्षाचे प्रसंग उद्भवतात. अशावेळी दुसरी बाजूदेखील समजून घेतली पाहीजे. त्यांच्या जमिनी जातात. खरं म्हणजे जमीन हीच त्यांची ओळख असते. या जमिनीवरच त्यांचा उदरनिर्वाह आहे, पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या जमिनीवर आरक्षण घालून त्यांना तुम्ही त्यांच्या मूळ जागेवरून दुसरीकडे जाण्यास सांगितले तर ही बाब त्यांच्या पचनी पडणे खूप अवघड असते. मात्र आपल्याला आता विकासाशी सांगड घालायची आहे, तेव्हा त्यांना विश्वासात घेऊन अधिकाधिक चांगली नुकसानभरपाई देणे आवश्यक आहे.आपल्यासारख्या नोकरदार वर्गाला विस्थापित होणाऱ्यांची परिस्थिती तेवढी लक्षात येणार नाही. पण जे आपल्या परंपरागत जमिनीवरून विस्थापित होतात, त्याची तीव्रता त्यांनाच अधिक जाणवते. मग काहीजण प्रकल्पग्रस्तांना भडकवणारे असतात, काहीजण स्वार्थासाठी नेतृत्व करणारे असतात. अशावेळी प्रशासन आहे, पोलीस आहेत, त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज असते. शासन या विषयावर गंभीर असून प्रकल्पग्रस्तांसाठी अनुकूल भूमिका घेत साडेबारा टक्केपासून ४० टक्केपर्यंत नुकसानभरपाई देण्याबाबत निर्णय घेतात. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना समृद्धी महामार्गाच्या उभारणीदरम्यान ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना समाधानकारक भरपाई दिली गेली, म्हणजेच जर विकास करायचा असेल तर जमिनी घ्याव्या लागतील आणि त्याबदल्यात समाधानकारक नुकसान भरपाई आणि सुसंवाद साधला तर संघर्षाची परिस्थिती निर्माण होणार नाही आणि कायदा सुव्यवस्था राखील जाईल, असा विश्वास वाटतो.
प्रश्नः नवी मुंबई परिसिरात नायजेरीयन, आफ्रीकन नागरिकांचे वास्तव्य आणि गुन्हेगारी कारवायांचे वाढते प्रमाण याबाबत नवी मुंबई पोलिसांनी काय कारवाई केली आहे ?
उत्तर: नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात नायजेरीयन तसेच आफ्रीकन नागरीक वास्तव्यायला होते, त्यातील अनेकजण वैद्यकीय सेवा वा इतर आवश्यक बाबींसाठी आलेले • असतात. मात्र दुर्दैवाने अनेक नायजेरीयन, – आफ्रीकन नागरिक हे चुकीच्या व्यवसायत ■शिरलेले आहेत. विशेषतः अमली पदार्थाच्या ■ अनैतिक व्यवहारात. खारघर, तलोजा, नेरुळ आदी भागात मोठ्या प्रमाणात नायजेरीयन नागरिकांचे वास्तव्य होते. उलवे परिसरातही न त्याचे वास्तव्य होते. मात्र गेल्या वर्षभरात डी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात धडक कारवाया म केल्या गेल्या. त्याचा परिणाम ते वास्तव्याला प असलेली घरे आता बंद आहेत. नवी मुंबई ती पोलिसांच्या कारवाईनंतर बेकायदेशीर व्यवसायात त सक्रीय असलेले नायजेरीयन, आफ्रीकन नागरिक णे ठाणे, मीरा भाईंदर आदी परिसरात गेल्याचे दिसून येते. या नागरिकांनी आपले ठिकाण बदलले बत असले तरी मीरा भाईंदर आणि आजुबाजूच्या . भागातून नवी मुंबईत येत असल्याचे अनेकदा न आढळून आले आहे. मात्र आम्ही अशा एक नागरिकांवर बारकाईने लक्ष ठेवत असल्यामुळे ना त्यांच्याशी निगडीत अनेक गुन्हे रोखण्यात नवी की मुंबई पोलिसांना चांगले यश आले आहे. , यासंदर्भात मी विशेष मोहीम सुरु करून वी नियमितपणे नायजेरियन, आफ्रीकन नागरिकांच्या कागदपत्रांची तपासणी करून जून गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात या नागरिकांना बारा त्यांच्या मायदेशी पाठवले आहे.
प्रश्नः निवडणुकांची लगबग सुरु झाली आहे. चीस मुंबई, ठाणे, नवी मुंबईतही तणावाची च्या पार्श्वभूमी असणार आहे. सत्तेत असणाऱ्या बांना पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्येच वादावादाची जर प्रसंग उद्भवत आहेत.
उत्तर : निवडणूका हा राजकीय पक्षांचा कार्यक्रम असला तरी कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम आमचे म्हणजे पोलिसांचे आहे. नवी मुंबईतील स्थानिक प्रतिनिधी तसेच वरिष्ठ पातळीवरील नेतेही अनुभवी आणि समजुतदार आहे. गेल्या सव्वा वर्षात काम करताना कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप पोलीस कामात आलेला नाही. आजवर कुणाचाही दबाव आलेला नाही. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण झाल्यास नियमानुसार कायदेशीर पावले उचलली जातील, हे मी स्पष्ट करू इच्छितो, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची हयगय सहन केली जाणार नाही. मात्र नवी मुंबईतील नागरिक आणि राजकीय संस्कृती पाहता कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल, अशाप्रकारच्या घटना घडणार नाहीत, असा आम्हाला विश्वास आहे.
प्रश्न : नवी मुंबईत ज्यापद्धतीने अमली पदार्थ जप्त केले जात आहेत, ते चिंताजनक आहे.
उत्तर: नवी मुंबई शहर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे इतर गुन्ह्यांप्रमाणे अमली पदार्थांचा बेकायदेशीर व्यापाराचे प्रमाण आढळून आले. त्यामुळे आम्ही विशेष मोहीम राबविण्यात सुरुवात केली. गेल्या महिन्याभरात पनवेल, कोपरखैरणे, रबाळे आदी भागांत मोठ्या कारवाई करून गांजा तसेच इतर अमली पदार्थ जप्त केले आहेत. गेल्या वर्षभरात अमली पदार्थांची तस्करी वा व्यवहार कमी झाल्या आहेत. तसेच याबाबत सातत्याने तपास करण्यात येत असून अमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यात येईल.
प्रश्नः वाढते शहरीकरण आणि रस्त्यावरील गुन्हेगारीचा आलेख वाढण्याची भिती.
उत्तर: प्रत्येक शहराचे, प्रदेशाची एक विशिष्ठ संस्कृती असते. मी सुरुवातीला इचलकरंजीमध्ये होतो. त्यानंतर नाशिकचा पोलीस अधिक्षक म्हणून काम केले. या भागांमध्ये हातमाग आहेत, पॉवरलूमचे उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग सक्रीय असतात आणि ते दिवस रात्र काम करीत असतात. अशावेळी त्यांच्या गरजा भागवण्याच्या दृष्टीकोनातून मग रात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थाचे ठेले सुरु असतात. ही व्यवस्थेची गरज निर्माण झालेली आहे. डोंगरी, मालवणीसारख्या भागात रात्रीचे गेलात तर गजबज आणि बीकेसी वा कुलाबा सारख्या परिसरात गेलात तर तिथे शुकशुकाट असतो. तशीच परिस्थिती नवी मुंबईतही अनुभवायला मिळेल. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला खाद्यपदार्थांचे वा तत्सम ठेले असतात, त्या ठिकाणी खाणारे बहुतांश कष्टकरी कामगार वर्ग असतो. अनेकदा कष्टांच्या कामामुळे नशापाणी करण्याची सवय लागते. या गोष्टीचे कदापि समर्थन करता येणार आहे. कारण अशाच गोष्टींमुळे अनेकदा गुन्हेगारी घटना घडतात. त्यामुळे या गोष्टींकडेही लक्ष ठेवण्याची गरज आहे.
———————————————————————————————–