दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 20 फेब्रुवारी  2024 

मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री  शिंदे यांनी आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी आदींनीही जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

मंत्रालयात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेटकरसहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छावविजय शिंदे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

ठाणे जिल्हा माहिती कार्यालयात अभिवादन

आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हा माहिती कार्यालयात जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ठाणे कार्यकारिणीचे उपाध्यक्ष मोहन पवार, दै. महानगरी वृत्तपत्राचे रणधीर कांबळे, अविरत वाटचालचे संपादक सिध्दार्थ हरळकर, दै. टाऊन दर्शनचे किशोर पंजवाणी तसेच जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त नमुंमपा मुख्यालयात अभिवादन

 मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम.सुजाता ढोले, भंडार विभागाचे उपायुक्त श्रीम.मंगला मालवे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.बाबासाहेब राजळे, प्रशासकीय अधिकारी श्री. उत्तम खरात व श्री.विलास मलुष्टे आणि विविध वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींसह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा परिषद ठाणे येथे अभिवादन
जिल्हा परिषद ठाणे, कृषी विभाग अंतर्गत कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी  सारिका शेलार तसेच कृषी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 जिल्हाधिकारी कार्यालयात तहसिलदार संजय भोसले यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती कोकण भवनात साजरी

मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर  यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन आज कोंकण भवनात त्यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी महसूल आणि इतर विभागाचे आधिकरी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळशास्त्री जांभेकरांनी 06 जानेवारी 1832 रोजी दर्पण या नावने पहिले मराठी वत्तपत्र सुरु करुन मराठी वृत्त्‍ापत्रसृष्टीचा पाया रचला. बाळशास्त्री जांभेकरांची पत्रकारीता समाज प्रबोधन व लोकशिक्षणाचे ज्ञान देणारे विद्यापीठ होते.  विधवा पुनर्विवाहाची चळवळ त्यांच्या लिखाणामुळे उभी राहिली.  जांभेकरांनी 1840 मध्ये दिग्दर्शन हे पहिले मराठी मासिक सुरु केले.

========================================================

 

========================================================