राज्यसभेच्या जागांसाठी अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, चंद्रकरांत हंडोरे यांना उमेदवारी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 14 फेब्रुवारी 2023:

येत्या 27 फेब्रुवारी रोजी राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी उदया 15 फेबुवारी रोजी अर्ज दाखल करता येणार आहेत. नारायण राणे, प्रकाश जावडेकर, व्ही. मुरलीधरन, वंदना चव्हाण, अनिल देसाई आणि कुमार केतकर यांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने रिक्त झालेल्या या 6 जागांसाठी ही निवडणूक होत आहे.

या जागांसाठी भाजपाकडून अशोक चव्हाण, माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कॉंग्रेसमधून शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केलेले मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उद्या दाखल होणा-या या उमेदवारी अर्जांची छाननी 16 फेबुवारी रोजी होणार आहे.

बातमी वाचाः  सिंहगड एक्सप्रेसमधून मुलीच्या अपहरणाचा डाव उधळून लावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा उपसभापती निलम गोऱ्हेंकडून सत्कार

राज्यात राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करतानाच इतर ठिकाणाचेही उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते जे.पी. नड्डा, गोविंदभाई ढोलकिया, मयंकभाई नायक, जशवंतसिंह सलामसिंह परमार यांना गुजरातमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीनुसार असून चंद्रकांत हंडोरे महाराष्ट्रातून, डॉ. अखिलेश सिंग बिहार मधून तर अभिषेक मनू सिंघवी हिमाचल प्रदेश इथून निवडणूक लढवणार आहेत.
—————————————————————————————————–