- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 7 फेब्रुवारी 2024
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्ह घड्याळ उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे असल्याचा निर्णय दिल्यानंतर विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने अजित पवारांवर टीका करण्यात आली आहे.
मनसेतर्फे पक्षाच्या X अकाउंटवर म्हटले आहे की, बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं सोप्प आहे. पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं, चिन्ह मिळवणं ह्यासाठी ‘राज ठाकरे’ यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिंमत लागते… असो, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ !
मनसेने अजित पवार यांंच्या भाषणाच्या जून्या व्हिडिओतील काही भाग पक्षाच्या अधिकृत X अकाउंट वरही पोस्ट केला आहे. त्यावेळी अजित पवार विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते. अजित पवार यांनी शिवसेना पक्षाच्या फुटीनंतर भाष्य केले होते. अजित पवार काय म्हणाले …
‘भुजां’मध्ये कितीही ‘बळ’ आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे ‘तट’ फोडून सत्तेसाठी घातलेला हा ‘वळसा’ महाराष्ट्राला ‘पटेल’ का?
वाह रे पट्ठ्या…! 🤨 pic.twitter.com/ZXcOk6y6oy
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 7, 2024
========================================================
========================================================
========================================================